स्लिप्ड डिस्क हा एक सर्वसामान्यपणे आढळणारा, पण वेदनादायक असा विकार आहे जो पाठीच्या कण्यावर परिणाम करतो. दरवर्षी भारतातील एकूण लोकसंख्येच्या २% लोकांना याचा त्रास होतो.
मणक्याच्या या स्थितीमुळे तीव्र वेदना, सुन्नपणा, आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो. योग्य वेळी उपचार न घेतल्यास हा विकार अधिक गंभीर होऊ शकतो.
स्लिप्ड डिस्क म्हणजे नक्की काय?
स्लिप्ड डिस्क म्हणजे एक अशी स्थिती आहे जिथे पाठीच्या कण्यातील एखादी स्पाइनल डिस्क सरकते किंवा फाटते आणि मज्जासंस्थेवर दबाव आणते. त्यामुळे मणक्यांच्या हालचालींवर परिणाम होतो आणि वेदना निर्माण होतात.
आपल्या मणक्यामध्ये असलेल्या या स्पाइनल डिस्क दोन कण्याच्या हाडांमध्ये उशींसारखे काम करतात आणि पाठीला सतत पडणाऱ्या धक्क्यांपासून मणक्याचे संरक्षण करतात. या डिस्क फाटल्यास आतील जेलसारखा पदार्थ बाहेर येतो आणि जवळपासच्या नसांवर दाब टाकतो, त्यामुळे वेदना होतात.
स्लिप्ड डिस्क होण्याची कारणे
खालील गोष्टी लक्षणीय परिणाम करतात.
- वयाचा परिणाम: जसजसे वय वाढते, तसतशे डिस्क्समधील पाणी निघून जाते आणि त्या कमजोर होतात.
- अनुवंशिकता: काही लोकांना त्यांच्या आनुवंशिकतेमुळे हा विकार होण्याची शक्यता अधिक असते.
- अपघात आणि दुखापती: अचानक झालेला अपघात किंवा मणक्यांवर झालेला जबरदस्त आघात डिस्क सरकण्यास कारणीभूत ठरू शकतो.
- चुकीची बसण्याची पद्धत: दीर्घकाळ वाकून बसणे किंवा चुकीच्या पोश्चरमुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो.
- अतिरिक्त वजन: लठ्ठपणामुळे पाठीच्या कण्यावर जास्त भार येतो, ज्यामुळे डिस्कच्या झिजण्याचा वेग वाढतो.
- जड वस्तू उचलणे: चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्यास पाठीच्या कण्यावर अनावश्यक ताण येतो आणि डिस्क सरकण्याचा धोका वाढतो.
स्लिप्ड डिस्कची लक्षणे
स्लिप्ड डिस्कची लक्षणे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकतात. मात्र, सर्वसामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- मणक्यात वेदना: पाठीच्या कण्याच्या कोणत्याही भागात वेदना होऊ शकते, विशेषतः कंबरेत किंवा मानेत.
- हातापायांवर परिणाम: जर डिस्क मज्जासंस्थेवर दाब देत असेल, तर पाय किंवा हातात सुन्नपणा, मुंग्या येणे, किंवा कमजोरी जाणवू शकते.
- स्नायूंची अशक्तता: स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ शकतो, ज्यामुळे चालताना अडचण येते किंवा वस्तू घट्ट पकडता येत नाहीत.
- हालचालींमध्ये त्रास: वाकणे, उभे राहणे, किंवा चालणे यामध्ये त्रास जाणवतो.
स्लिप्ड डिस्कचे निदान
डॉक्टर खालील चाचण्यांच्या आधारे स्लिप्ड डिस्कचे निदान करतात:
- शारीरिक तपासणी: डॉक्टर वेदनेचा स्रोत शोधण्यासाठी आणि हालचालींची क्षमता तपासण्यासाठी काही चाचण्या करतात.
- MRI आणि CT स्कॅन: पाठीच्या कण्याची सविस्तर प्रतिमा मिळवण्यासाठी MRI किंवा CT स्कॅन केला जातो.
- एक्स-रे: हाडांच्या संरचनेत बदल आहेत का हे पाहण्यासाठी X-ray केला जातो.
- इलेक्ट्रोमायोग्राम (EMG): मज्जासंस्थेवरील दाब आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेची तपासणी करण्यासाठी इलेक्ट्रोमायोग्राम केला जातो.
- नर्व्ह कंडक्शन वेलॉसिटी (NCV) टेस्ट: मज्जासंस्थेच्या कार्यक्षमतेची चाचणी करण्यासाठी ही टेस्ट केली जाते.
स्लिप्ड डिस्कसाठी उपचार पद्धती
स्लिप डिस्कवर शस्त्रक्रियाविरहित पर्यायांनीही उपचार करता येतात.
शस्त्रक्रियेशिवाय उपचार पद्धती:
- औषधोपचार: वेदना कमी करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी ऍन्टी-इन्फ्लेमेटरी औषधे दिली जातात. स्नायू शिथिल करणारी औषधे देखील दिली जाऊ शकतात.
- नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट: या उपचाराने पाठीच्या कण्यावरील ताण कमी केला जातो ज्यामुळे डिस्क पुन्हा बरी करण्यास मदत होते.
- फिजिओथेरपी: नियमित व्यायाम आणि योग्य स्ट्रेचिंगमुळे स्नायू बळकट होतात आणि वेदना कमी होतात.
- अॅक्युपंक्चर: बारीक सुया वापरून मज्जासंस्थेवरील दाब कमी केला जातो ज्यामुळे वेदनेचे निवारण होऊ शकते.
- मॅकेंझी पद्धत: या थेरपीमध्ये स्नायू बळकट करण्यासाठी आणि डिस्कचा दबाव कमी करण्यासाठी विशिष्ट व्यायाम समाविष्ट असतो.
- मेडिटेशन आणि योग: येथे मानसिक ताण कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे स्नायूंवरील ताणही कमी होतो.
शस्त्रक्रिया:
जर वर दिलेल्या उपचारांनी वेदना कमी होत नसेल, तर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात. शस्त्रक्रिया ही शेवटचा उपाय असतो आणि केवळ गंभीर परिस्थितीतच याची शिफारस केली जाते.
स्लिप्ड डिस्कची प्रतिबंधात्मक उपाययोजना
जीवनशैलीतील काही बदल वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.
- नियमित व्यायाम करा: स्नायू बळकट करण्यासाठी आणि पाठीचा कणा लवचिक ठेवण्यासाठी हलक्या व्यायामाचा सराव करा.
- योग्य पोश्चर ठेवा: बसताना आणि उभे राहताना पाठीचा कणा सरळ ठेवा.
- अतिरिक्त वजन टाळा: संतुलित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे वजन नियंत्रणात ठेवा.
- जड वस्तू उचलताना योग्य पद्धत वापरा: पाय वाकवून वस्तू उचला, पाठीवर ताण येऊ देऊ नका.
- ताणतणाव कमी करा: मेडिटेशन आणि योगासारख्या पद्धतींचा अवलंब करा.
लवकर निदान आणि योग्य उपचार का महत्त्वाचे आहेत?
स्लिप्ड डिस्कचा योग्यवेळी उपचार न केल्यास, तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे लवकर निदान आणि योग्य उपचार आवश्यक आहेत. शस्त्रक्रियेशिवाय उपचार पर्याय अधिक सुरक्षित आणि प्रभावी असतात. विशेषतः नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट, फिजिओथेरपी, आणि योगासारख्या पद्धतींनी वेदना नियंत्रणात ठेवता येतात आणि मणक्यांचे आरोग्य सुधारता येते.
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी ANSSI वचनबद्ध आहे.
ANSSI Wellness शी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.