डिस्क बल्ज ही एक सर्वसामान्यपणे आढळणारी आणि वेदनादायक अशी स्थिती आहे, जी विशेषतः कंबर व मणक्याच्या भागात त्रास देते. आपल्या मणक्यातील डिस्क जेव्हा बाहेर सरकते, तेव्हा आसपासच्या मज्जातंतू (नर्व्ह) वर दाब येतो. ह्या स्तिथीवर जर वेळीच लक्ष दिले नाही, तर ती सायटिका किंवा त्यासारखी गंभीर पाठदुखी निर्माण करू शकते.
सुदैवाने, शस्त्रक्रियेशिवाय योग, जीवनशैलीतील बदल, आणि काही सुरक्षित नॉन-सर्जिकल उपचारांच्या माध्यमातून या स्थितीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येते.
डिस्क बल्ज म्हणजे काय?
आपल्या मणक्याच्या हाडांमध्ये असलेल्या स्पाइनल डिस्क्स या सॉफ्ट कुशनसारख्या असतात, ज्या शरीराच्या हालचालींना लवचिकता देतात आणि हाडांमध्ये घर्षण होऊ देत नाहीत.
परंतु वयानुसार झालेली झीज, चुकीचा पोश्चर (बसण्याची किंवा उभे राहण्याची मुद्रा), जास्त वजन, किंवा चुकीच्या पद्धतीने भार उचलल्यामुळे ह्या डिस्कवर दबाव येतो. अश्या दबावामुळे डिस्कमधील मऊ पदार्थ बाहेर येऊन डिस्कमध्ये एक फुगवटा निर्माण होतो. यालाच डिस्क बल्ज म्हणतात.
डिस्कला आलेला फुगवटा जवळपासच्या नर्व्हवर दाब टाकतो. यामुळे निर्माण होणारी लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:
- पाठदुखी किंवा मानेत वेदना
- सुन्नपणा किंवा मुंग्या येणे
- सायटिकासारखा त्रास म्हणजे पायात जाणारी वेदना
- हालचाली करताना त्रास
योगासनांचा प्रभाव
योग ही भारतीय परंपरेतील अशी पद्धत आहे जी शरीर, मन, आणि श्वास यांचा समन्वय साधते. विशेषतः डिस्क बल्जसारख्या मणक्याशी संबंधित विकारांवर योग अत्यंत प्रभावी ठरतो.
सौम्य योगासने
योग करताना जोरदार अशी आसने टाळावीत. डिस्क बल्जसाठी काही सौम्य पण प्रभावी योगासने खालीलप्रमाणे आहेत:
- भुजंगासन (कोब्रा पोझ): मणक्याला सौम्यपणे पाठीमागे वळवते आणि स्पाईनला स्ट्रेच करते.
- मकरासन (क्रोकोडाइल पोज): ही एक आरामदायक स्थिती असून, ती पाठीला आधार देते आणि थकवा कमी करते.
- अर्धमत्स्येन्द्रासन (हाफ स्पाइनल ट्विस्ट): पाठीच्या लवचिकतेसाठी उपयुक्त आहे.
योगाचे फायदे:
- मणक्याची लवचिकता वाढवतो.
- स्नायू मजबूत करतो.
- नर्व्हवरील दाब कमी करतो.
- संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुधारतो.
- मानसिक तणाव कमी करतो.
नियमित योगसाधना केल्यास केवळ वेदना कमी होत नाही, तर त्या वेदना पुन्हा जाणवण्याची शक्यता देखील घटते.
जीवनशैलीतील बदल
योगासोबतच आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल केल्यास डिस्क बल्जसारख्या त्रासांवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवता येते:
१. योग्य पोश्चर राखा
बसताना किंवा उभे राहताना पाठीचा कणा सरळ ठेवणे आवश्यक आहे. काम करताना कॉम्पुटरचा स्क्रीन डोळ्यांच्या समोर असावा.
२. वजन नियंत्रणात ठेवा
जास्त वजन मणक्यावर अतिरिक्त ताण टाकतो, जो डिस्कची झीज वाढवतो.
३. सतत एकाच स्थितीत न बसणे
दर ३०-४५ मिनिटांनी थोडे फिरणे आणि शरीराला हलकासा ताण देणे आवश्यक आहे.
४. मोबाइल/लॅपटॉप वापरण्याच्या सवयी सुधारा
मान खाली झुकवून मोबाइल वापरणे टाळा. लॅपटॉप टेबलवर ठेवून वापरा.
५. पुरेशी झोप घ्या आणि ताणतणावांवर नियंत्रण ठेवा
योग्य झोपेची मुद्रा, मऊ उशी, आणि तणावमुक्त जीवनशैली हे सर्व मणक्याच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत.
डिस्क बल्जसाठी शस्त्रक्रियाविरहित आणि सुरक्षित उपचार
योग आणि जीवनशैलीतील बदल हे डिस्क बल्जवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी आहेत. मात्र काही रुग्णांना जास्त त्रास असल्यास त्यांना अतिरिक्त उपचारांची गरज भासते.
फिजिओथेरपी
तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या फिजिओथेरपीच्या व्यायामामुळे स्नायू मजबूत होतात आणि वेदना कमी होते.
गरम/थंड शेक
तुमच्या पाठीच्या स्नायूंना आराम देण्यासाठी गरम कॉम्प्रेस आणि जळजळ कमी करण्यासाठी कोल्ड पॅक वापरा.
नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट
या उपचारामध्ये पाठीला सौम्य, नियंत्रित ताण दिला जातो, ज्यामुळे डिस्कचा फुगवटा कमी होतो. परिणामी, नर्व्हवरील दाब घटतो आणि तुम्हाला वेदनामुक्ती मिळते, तीही औषधे किंवा सर्जरी न करता!
नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशनचे फायदे:
- औषध आणि सर्जरी शिवाय आराम
- नैसर्गिकरित्या बरे होण्यास मदत
- दीर्घकालीन परिणाम
- प्रभावी आणि सुरक्षित ट्रीटमेंट
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी ANSSI वचनबद्ध आहे.
ANSSI Wellness शी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.