गुडघेदुखी हा आजकाल सर्व वयोगटातील लोकांना भेडसावणारा एक त्रास आहे. काहींना हा त्रास जखमेमुळे तर काहींना सांध्यातील झीज किंवा सूजेमुळे होतो. सुरुवातीला किरकोळ वाटणारी गुडघेदुखी, वेळेत कारण न ओळखल्यास गंभीर रूप धारण करू शकते.
त्यामुळे वेदनेमागील कारण समजून घेणे आणि योग्य वेळी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
गुडघा हा शरीरातील सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा सांधा आहे. यात हाडे, लिगामेंट्स, मेनिस्कस (कुशन तंतु) आणि स्नायू यांचा समावेश असतो. यापेंकी कोणत्याही घटकात इजा, झीज, किंवा जळजळ झाली तर वेदना, सूज, आणि हालचालींमध्ये अडचण निर्माण होते.
गुडघेदुखीची सामान्य कारणे
गुडघेदुखी ही केवळ वयोमानाची समस्या नाही; ती अनेक दुसऱ्या कारणांमुळेही उद्भवते.
- ऑस्टिओआर्थ्रायटिस: वयोमानानुसार किंवा सततच्या ताणामुळे सांध्यातील कार्टिलेज झिजते आणि त्यामुळे हाडांवर घर्षण वाढून वेदना आणि ताठरता निर्माण होते.
- रुमेटॉइड आर्थ्रायटिस: प्रतिकारशक्तीतील बिघाडामुळे सांध्यात जळजळ होते. यामध्ये दोन्ही गुडघे सूजतात आणि हालचाल कमी होते.
- लिगामेंटमधे इजा: खेळताना किंवा अपघातात अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट (ACL) किंवा मेडिअल कोलॅटरल लिगामेंट (MCL) तुटतात किंवा ताणले जातात.
- मेनिस्कस फाटणे: गुडघ्यातील कुशन तंतू वळल्याने किंवा धक्क्याने फाटतात, ज्यामुळे वेदना आणि लॉकिंग सारखी जाणीव होते.
- बर्सायटिस: सांध्यातील द्रवपिशवीत सूज येते.
- टेंडोनायटिस: स्नायुबंधनाच्या जळजळीमुळे वेदना होते, विशेषतः सतत पायावर ताण आल्यास.
- जास्त वजन: सांध्यावर सततचा अतिरिक्त दबाव येतो.
कारण ओळखण्याची लक्षणे
- हालचालीदरम्यान किंवा विश्रांतीत वेदना
- सकाळी स्टिफनेस (ताठरता) किंवा हालचाली सुरू होईपर्यंत वेदना
- सूज, लालसरपणा, किंवा उष्णता जाणवणे
- गुडघा वाकवताना किंवा सरळ करताना क्लिकिंग किंवा क्रॅकिंग सारखे आवाज
- जिना चढताना किंवा उतरताना त्रास
- अचानक हालचाली करताना गुडघा “लॉक” होणे
वैद्यकीय सल्ला केव्हा घ्यावा?
- तीव्र आणि अचानक सुरु झालेली वेदना
- अपघातानंतर त्वरित आलेली सूज व हालचालींमध्ये अडचण
- पायात सुन्नपणा, मुंग्या येणे, किंवा कमजोरी
- दीर्घकाळ टिकणारी व वाढणारी वेदना
- गुडघा वाकवणे किंवा सरळ करणे कठीण होणे
दीर्घकालीन गुडघेदुखीसाठी शस्त्रक्रियेविना उपचार
गुडघेदुखीच्या अनेक प्रकरणांमध्ये सर्जरी हा अंतिम पर्याय असतो. मात्र, अनेक वेळा सुरक्षित आणि प्रभावी नॉन-सर्जिकल उपचार उपलब्ध असतात, जे वेदना कमी करून सांध्याचे आरोग्य सुधारतात.
- फिजिओथेरपी: विशेष व्यायामांद्वारे गुडघ्याभोवतालचे स्नायू मजबूत होतात, लवचिकता वाढते, आणि हालचाली सुधारण्यास मदत होते.
- अँटी-इंफ्लेमेटरी आहार: हळद, आले, ओमेगा-३ युक्त पदार्थ, हिरव्या भाज्या, आणि फळे, हे सूज कमी करण्यात मदत करतात.
- योगासने: मकरासन, ताडासन, आणि सौम्य स्ट्रेचिंगने सांध्यावरील ताण कमी होतो.
- गरम/थंड पॅक थेरपी: दुखऱ्या भागावर गरम पॅकने रक्तप्रवाह सुधारतो, तर थंड पॅकने सूज कमी होते.
नॉन-सर्जिकल नी डीकंप्रेशन ट्रीटमेंट
ही एक अत्याधुनिक, वेदनारहित, आणि शस्त्रक्रियेशिवाय होणारी उपचारपद्धती आहे.
कसे कार्य करते?
विशेष संगणक-नियंत्रित उपकरणाद्वारे गुढघ्यातील सांध्याला सौम्य ताण दिला जातो. यामुळे सांध्यातील दाब कमी होतो आणि रक्तप्रवाह आणि पोषक घटकांचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे नैसर्गिक उपचार प्रक्रिया वेगाने सुरू होते.
फायदे
- औषधे किंवा इंजेक्शनशिवाय वेदना कमी होते.
- सांध्याची हालचाल सुधारते.
- सूज आणि ताठरता कमी होते.
- दीर्घकालीन आराम मिळतो.
कोणासाठी उपयुक्त?
-
- ऑस्टिओआर्थ्रायटिस
- जुन्या दुखापतीनंतरच्या वेदना
- लिगामेंट किंवा मेनिस्कस मध्ये इजा होऊन निर्माण होणारी ताठरता
- गुडघ्याच्या सांध्याचा ऱ्हास
- ६ आठवड्यांपेक्षा जुने दुखणे
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या आणि गुडघ्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल नी डीकंप्रेशन उपचारांद्वारे रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी ANSSI वचनबद्ध आहे.
ANSSI Wellness शी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.