पाठदुखी आणि मानदुखी ही आजच्या पिढीसाठी एक मोठी आरोग्य समस्या बनली आहे. ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसून काम करणे, सतत मोबाईल किंवा लॅपटॉपकडे बघणे, व्यायामाचा अभाव, आणि वाढते वय, या सर्व कारणांमुळे मणक्याशी संबंधित विकार झपाट्याने वाढत आहेत. यांपैकी एक महत्त्वाचा विकार म्हणजे स्पोंडिलोसिस.
स्पोंडिलोसिस म्हणजे मणक्याची हाडे, डिस्क्स, आणि सांध्यांमध्ये होणारी झीज. सुरुवातीला ही समस्या किरकोळ स्टिफनेस (कडकपणा), किंवा हलक्या वेदनेच्या स्वरूपात जाणवते, पण हळूहळू ती वाढून हालचालींमध्ये अडचण, नसा दाबल्या जाणे, आणि दीर्घकालीन वेदना, यामध्ये परिवर्तित होते.
अनेकांना वाटते कि स्पोंडिलोसिसवर शस्त्रक्रिया हाच अंतिम उपाय आहे, परंतु प्रत्यक्षात अनेक सुरक्षित आणि प्रभावी शस्त्रक्रियाविरहित उपचार पर्याय उपलब्ध आहेत.
स्पोंडिलोसिस म्हणजे काय?
स्पोंडिलोसिस ही एक डिजेनेरेटिव स्थिती आहे, म्हणजे यामध्ये मणक्यातील टिशू आणि डिस्क्स हळूहळू झिजतात.
- सर्व्हायकल स्पोंडिलोसिस: हा त्रास मानेच्या भागात होतो. यात मानेत आणि खांद्यापर्यंत वेदना, डोके फिरवताना स्टिफनेस, आणि हातात सुन्नपणा किंवा कमजोरी जाणवते.
- लंबर स्पोंडिलोसिस: हा त्रास कंबरेत होतो. यात कंबरदुखी, पायात वेदना किंवा मुंग्या, जिना चढताना त्रास, आणि बसून उठताना स्टिफनेस जाणवतो.
सामान्य लक्षणे:
- सततची पाठीत किंवा मानेत वेदना
- स्टिफनेस; विशेषतः सकाळी उठल्यावर
- हालचालींमध्ये अडचण
- डोकेदुखी (सर्व्हायकल स्पोंडिलोसिसमध्ये)
- पायात किंवा हातात सुन्नपणा, कमजोरी
पारंपरिक उपचार व त्यांचे तोटे
स्पोंडिलोसिससाठी सामान्यतः औषधे, इंजेक्शन्स, किंवा शस्त्रक्रिया सुचवली जाते.
- औषधे आणि इंजेक्शन्स: वेदना व सूज कमी करतात, पण तात्पुरता आराम मिळतो. दीर्घकाळ वापरल्यास किडनी किंवा पोटाच्या समस्या होऊ शकतात.
- शस्त्रक्रिया: गंभीर केसेसमध्ये केली जाते, पण खर्चिक आहे आणि त्यामध्ये धोके अधिक असतात. शिवाय, पूर्ण बरे होण्यासाठी वेळ लागतो.
या पद्धतींमुळे वेदना तात्पुरत्या थांबतात, पण मूळ कारणावर उपचार होत नाही.
प्रभावी व सुरक्षित उपचार पर्याय
खालील शस्त्रक्रियेशिवायचे उपचार पर्याय उपयोगी आहेत.
फिजिओथेरपी आणि स्ट्रेचिंग
फिजिओथेरपीमुळे पाठीचे स्नायू मजबूत होतात. नियमित स्ट्रेचिंगने स्टिफनेस कमी होतो आणि मणक्यावरचा ताण हलका होतो.
योगासने
योग हा स्पोंडिलोसिसवर एक नैसर्गिक उपाय आहे.
- भुजंगासन: मणक्याला स्ट्रेच मिळतो.
- मकरासन: स्नायूंना विश्रांती मिळते.
- ताडासन: पोश्चर सुधारतो.
- अर्धमत्स्येन्द्रासन: स्पाइनची लवचिकता वाढते.
अँटी-इंफ्लेमेटरी आहार
आहाराचा थेट परिणाम शरीरातील सूज आणि वेदनांवर होतो.
- काय घ्यावे?: हळद, आले, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स (अळशी, बदाम, मासे), हिरव्या भाज्या, फळं, इत्यादी
- काय टाळावे?: प्रोसेस्ड फूड्स, तळलेले पदार्थ, आणि साखरयुक्त पदार्थ
योग्य पोश्चर आणि जीवनशैलीत सुधारणा
- खूप वेळ बसणे टाळा आणि दर ३० मिनिटांनी उठून थोडे फिरा.
- लॅपटॉप/मॉनिटर डोळ्यांच्या उंचीवर ठेवा.
- योग्य गादी आणि खुर्चीचा वापर करा.
- वजन नियंत्रणात ठेवा आणि नियमित व्यायाम करा.
- मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करा.
नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट
आजच्या काळात ही एक अत्याधुनिक, संगणक-नियंत्रित पद्धत आहे.
कसे काम करते?
मणक्याला सौम्य आणि नियंत्रित ताण दिला जातो. त्यामुळे डिस्कवरील दाब कमी होतो आणि दबलेल्या नसा मुक्त होतात.
फायदे:
- शस्त्रक्रियेशिवाय दीर्घकालीन आराम
- औषधे किंवा इंजेक्शन्सची गरज नाही
- वेदना, सूज, आणि स्टिफनेस कमी होतो
- मणक्याची हालचाल सुधारते
कोणासाठी उपयुक्त?
सर्व्हायकल आणि लंबर स्पोंडिलोसिस, डिस्क बल्ज, सायटिका, डिजेनेरेटिव डिस्क डिसीज असलेल्या रुग्णांसाठी नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट उपयुक्त आहे.
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी ANSSI वचनबद्ध आहे.
ANSSI Wellness शी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.