आपल्या आधुनिक आणि कॉम्पुटरवर-आधारित अश्या जीवनशैलीमुळे पाठदुखी, मानदुखी आणि मणक्याशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस (मानेतील झीज) आणि लंबर स्पॉन्डिलोसिस (कंबरेतील झीज) हे अत्यंत सामान्य पण त्रासदायक विकार आहेत. या विकारांमध्ये मणक्याच्या हाडांची झीज होते, ज्यामुळे स्पाइनल डिस्क्स आणि नसा दबल्या जातात. परिणामी, वेदना, कडकपणा, आणि हालचालींमध्ये मर्यादा निर्माण होते.
पारंपरिक उपचारांमध्ये औषधे, इंजेक्शन्स आणि अनेकदा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. पण शस्त्रक्रिया ही महाग, गुंतागुंतीची, आणि लांब रिकव्हरीमुळे वेळखाऊ प्रक्रिया असते. अशा वेळी एक सुरक्षित, वैज्ञानिक, व शस्त्रक्रियेशिवाय पर्याय म्हणजे नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट (NSSDT).
स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय?
स्पॉन्डिलोसिस ही मणक्याच्या सांध्यांमध्ये होणारी वयोमानानुसारची झीज असते. ती मणक्यामधील डिस्क्सच्या ओलसरपणात घट, हाडांची झीज, आणि स्नायूंच्या लवचिकतेचा अभाव, या कारणांमुळे होते. परिणामी, डिस्क सरकते किंवा खाली बसते, आणि आजूबाजूच्या नसांवर दाब टाकते.
सामान्य लक्षणे:
- सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस मध्ये मानेतील कडकपणा (स्टिफनेस) आणि डोके दुखणे, यांबरोबर खांद्यात आणि हातात वेदना व सुन्नपणा जाणवतो.
- लंबर स्पॉन्डिलोसिस मध्ये कंबरेत वेदना, पायात झिणझिण्या, चालताना त्रास, आणि हालचालींमध्ये मर्यादा निर्माण होते.
- दिवसभर वाढणारा थकवा आणि कामकाजात अडचण सुद्धा दिसते.
ही स्थिती हळूहळू वाढत जाते आणि योग्य उपचार न मिळाल्यास तीव्र स्वरूप धारण करू शकते.
नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट म्हणजे काय?
NSSDT ही एक वैज्ञानिक उपचारपद्धती आहे, जी संगणक-नियंत्रित विशेष उपकरणांद्वारे दिली जाते. या उपचाराचा उद्देश मणक्यावरील आणि नसा व डिस्कवरील ताण सौम्य व नियंत्रित ताणाद्वारे कमी करणे हा आहे.
ट्रीटमेंट कशी केली जाते?
- रुग्ण एका विशिष्ट डीकंप्रेशन टेबलवर झोपतो.
- उपकरण मणक्याला सौम्य ताण देते, जो नियंत्रित व वैयक्तिक गरजेनुसार ठरवलेला असतो.
- यामुळे मणक्यातील डिस्कवरचा दाब कमी होतो.
- नसा मुक्त होतात आणि सूज कमी होते.
- डिस्क्समध्ये पुन्हा पोषक तत्वांचा प्रवाह सुरू होतो.
- शरीराची नैसर्गिकरित्या बरे होण्याची प्रक्रिया चालू होते.
ही ट्रीटमेंट आरामदायक, सुरक्षित, आणि वेदनारहित आहे. रुग्ण ट्रीटमेंट दरम्यान झोपून राहतात आणि त्यांना कोणताही त्रास जाणवत नाही.
सर्व्हायकल व लंबर स्पोंडिलोसिससाठी फायदे
NSSDT ही दोन्ही प्रकारच्या, म्हणजेच सर्व्हायकल आणि लंबर स्पॉन्डिलोसिससाठी प्रभावी आहे. कारण ही ट्रीटमेंट मणक्याच्या ज्या भागात झीज झालेली आहे त्या भागाला सौम्य ताण देते आणि मूळ कारणावर उपचार करते.
फायदे:
- नर्व्हवरील दाब कमी होतो: सायटिका, मानेतून खांद्याकडे जाणारी झिणझिण्यासकट वेदना, किंवा पायातली झणझण कमी होते.
- डिस्कमध्ये हायड्रेशन सुधारते: झीज झालेल्या डिस्क्स पुन्हा पोषण घेऊ लागतात.
- वेदना व कडकपणा कमी होतो: रोजच्या हालचालींमध्ये सुधारणा होते.
- शस्त्रक्रिया टळते: रुग्णांना महाग व धोकादायक सर्जरीपासून सुटका मिळते.
- औषधांशिवाय उपचार होतो: रोजच्या वेदनाशामक गोळ्यांपासूनही सुटका मिळते.
- रुग्ण लवकरच कार्यक्षम होतो: रुग्ण पुन्हा आपले दैनंदिन काम सुरु करू शकतो.
नॉन-सर्जिकल स्पायनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट हा एक दीर्घकालीन आराम देणारा उपाय आहे, जो केवळ लक्षणांवर नाही, तर मुळ कारणावर उपचार करतो.
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी ANSSI वचनबद्ध आहे.
ANSSI Wellness शी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.