कंबरदुखी, ज्याला आपण लोअर बॅक पेनही म्हणतो, हा आजच्या युगातील एक अत्यंत सर्वसामान्य पण त्रासदायक आजार आहे. तरुण वयातही बऱ्याच जणांना हे दुखणे सतावत असते. कामाच्या सवयी, ताणतणाव, किंवा बसण्याची चुकीची मुद्रा, यामुळे पाठीवर सतत ताण येतो. अनेक वेळा औषधं वा सर्जरी याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही.
मात्र, सध्या एक नैसर्गिक, नॉन-सर्जिकल उपाय लोकप्रिय ठरत आहे; तो म्हणजे नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट.
कंबरदुखीची कारणे
लोअर बॅक पेन / कंबरदुखीबाबत बहुतेक समस्या खाली दिलेल्या आजारांमुळे होतात.
- डिस्क बल्ज किंवा हर्निएटेड डिस्क
- डीजेनेरेटिव्ह डिस्क डिजीज
- सायटिका / पायात जाणारी वेदना
आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये स्पाइनल डिस्क नावाचे सॉफ्ट कुशनसारखे भाग असतात. ह्या डिस्क्स मणक्यामध्ये लवचिकता आणि हालचाल घडवून आणण्यास मदत करतात.
पण वयानुसार झिज, चुकीचे पोश्चर, किंवा अचानक जड वस्तू उचलणे, यामुळे या डिस्क्समध्ये बिघाड होतो. त्या बाहेर सरकतात (डिस्क बल्ज/हर्निएशन) किंवा फाटतात आणि जवळच्या मज्जातंतूं (नर्व्ह) वर दाब टाकतात. यामुळे पाठीत तीव्र वेदना, सुन्नपणा, आणि चालताना अडथळा जाणवतो. ही स्थिती सायटिका सारख्या आजारातही विकसित होऊ शकते.
अश्या डिस्कचा आजार असलेल्या अनेक रुग्णांना वाटते की आता सर्जरीच एकमेव पर्याय आहे. पण सर्जरीनंतरचा रिकव्हरीचा कालावधी किंवा खर्च अश्या जोखिमा असतातच, परंतु काहीवेळा सर्जरी यशस्वी न होणे किंवा परिस्थिती आणखी गंभीर होणे अशी धोक्याची टांगती तलवारही असते.
नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट म्हणजे काय?
नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट ही एक अत्याधुनिक उपचारपद्धती आहे जी मणक्यावरील दाब कमी करून नैसर्गिक आराम देते.
या ट्रीटमेंटमध्ये खास मशीनच्या साहाय्याने मणक्याला सौम्य, नियंत्रित ताण दिला जातो. हा ताण मणक्यामध्ये नकारात्मक दाब (निगेटिव्ह प्रेशर) निर्माण करतो. यामुळे बाहेर आलेली डिस्क पुन्हा मूळ जागेवर परत येते आणि नर्व्हवरील दाब कमी होतो. शिवाय, या प्रक्रियेमुळे डिस्कमध्ये पोषकतत्वं आणि पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या बरे होण्याची प्रक्रिया वेग घेते.
ही ट्रीटमेंट रुग्णाला पूर्णतः आरामदायक स्थितीत दिली जाते. कोणतेही औषध, इंजेक्शन, किंवा काटछाट न करता रुग्णास दीर्घकालीन आराम मिळतो.
नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंटचे फायदे
शस्त्रक्रिया टाळू इच्छिणाऱ्या रुग्णांसाठी नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट अत्यंत प्रभावी ठरते.
१. वेदना आणि सूज कमी करते
ट्रीटमेंटनंतर अनेक रुग्णांच्या पाठदुखीत आणि पायात येणाऱ्या सुन्नतेत लक्षणीय घट होते. नर्व्हवरील दाब कमी झाल्याने सूज आणि वेदना आपोआप कमी होतात.
२. हालचालींमध्ये सुधारणा
रुग्ण पुन्हा वाकू शकतो, चालू शकतो, आणि काम करू शकतो; तेही पूर्वीपेक्षा अधिक सहजतेने.
३. नैसर्गिक उपचार पद्धत
डिस्क्सना पोषक घटक मिळू लागतात आणि त्या स्वतःहून पुन्हा जोमदार होतात. त्यामुळे उपचाराचा परिणाम अधिक दीर्घकाल टिकतो.
४. सर्जरीशिवाय बरे होण्याचा मार्ग
सर्जरीमुळे होणारा खर्च, हॉस्पिटलमध्ये वास्तव्य, आणि भूल देणारी औषधे, अश्या अन्य जोखीमा टाळता येतात. अनेक रुग्णांमध्ये सर्जरीची गरजच भासत नाही.
५. फिजिओथेरपी आणि मार्गदर्शनासोबत परिणाम अधिक चांगले
ANSSI Wellness सारख्या क्लिनिक्समध्ये ही ट्रीटमेंट रुग्णाच्या स्थितीनुसार सानुकूलित केली जाते. त्यासोबत योग्य पोश्चर, स्ट्रेचिंग, आणि आहाराबद्दल मार्गदर्शन दिले जाते, जे रुग्णाच्या संपूर्ण रिकव्हरीला गती देते.
ANSSI Wellness: नॉन-सर्जिकल उपचारात अग्रेसर
ANSSI Wellness हे भारतातील आघाडीचे स्पाईन क्लिनिक आहे जे केवळ नॉन-सर्जिकल उपचारच देते. येथे कोणतीही औषधं, इंजेक्शन, किंवा शस्त्रक्रिया न करता वैज्ञानिक पद्धतीने उपचार केले जातात. हजारो रुग्णांनी येथे नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट घेऊन वेदनामुक्त जीवनशैली पुन्हा मिळवली आहे.
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी ANSSI वचनबद्ध आहे.
ANSSI Wellness शी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.