आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तासन्-तास संगणकावर काम करणे, चुकीच्या पद्धतीने बसणे, किंवा जड वस्तू उचलणे अश्या गोष्टींमुळे पाठीच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातीलच एक गंभीर समस्या म्हणजे डिस्क बल्ज.
डिस्क बल्जमुळे पाठीतील मज्जातंतूंवर दाब येतो, वेदना आणि सुन्नपणा जाणवतात, तसेच हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो. वेळीच निदान व उपाय केल्यास या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
योग्य उपचारांनी आणि रोजच्या जीवनशैलीत बदल करून तुम्ही डिस्क बल्जमुळे होणारा त्रास टाळू शकता.
डिस्क बल्ज म्हणजे नक्की काय?
पाठीच्या कण्यामध्ये असलेल्या इंटरव्हर्टिब्रल डिस्क्स एका उशीसारखे काम करतात, ज्यामुळे कण्यातील हाडांमध्ये घर्षण होत नाही. प्रत्येक डिस्कभोवती एक फायबरने बनलेला थर असतो आणि आतील भागात मऊ जेलसदृश पदार्थ असतो.
जेव्हा हे बाहेरील कवच कमजोर होते, तेव्हा मणक्यावरील अति दबावामुळे आतील पदार्थ बाहेर ढकलला जातो. यामुळे डिस्क बल्ज किंवा फुगवटा निर्माण होतो आणि हा बाहेर आलेला भाग मज्जातंतूंवर दाब देतो. अशा स्थितीमुळे वेदना, अशक्तपणा, आणि हालचालींमध्ये अडथळा जाणवतो.
डिस्क बल्जची कारणे
डिस्क बल्ज होण्यामागे विविध कारणे असू शकतात. यातील काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
१. वयानुसार होणारे बदल
वय वाढल्यास डिस्कमधील नैसर्गिक लवचिकता कमी होते आणि डिस्क अधिक कमजोर होते. त्यामुळे ती सहज बाहेर सरकण्याची शक्यता वाढते.
२. चुकीची बसण्याची पद्धत
सतत एका चुकीच्या पोझिशनमध्ये बसणे, पुढे झुकून काम करणे, किंवा मान पुढे ठेवणे, यामुळे पाठीवर अनावश्यक ताण येतो आणि डिस्कवर दबाव वाढतो.
३. अचानक जड वस्तू उचलणे
चुकीच्या पध्द्तीने जड वस्तू उचलल्यास पाठीच्या कण्यावर ताण येतो आणि त्यामुळे डिस्क सरकण्याचा धोका असतो.
४. अनुवंशिकता
काही लोकांमध्ये अनुवांशिकतेमुळे डिस्क कमजोर होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे अशा लोकांना हा त्रास लवकर जाणवतो.
५. लठ्ठपणा आणि निष्क्रिय जीवनशैली
अधिक वजन असल्यास पाठीवरचा ताण वाढतो, ज्यामुळे डिस्कवर अतिरिक्त दडपण येते. तसेच व्यायामाचा अभाव असल्यास पाठीला सपोर्ट करणारे स्नायू कमकुवत होतात आणि पाठदुखी वाढते.
डिस्क बल्जची लक्षणे
डिस्क बल्जची लक्षणे वेगवेगळी असू शकतात, परंतु सर्वसाधारणपणे खालील त्रास जाणवतो:
- पाठदुखी आणि मानदुखी: दीर्घकाळ बसल्यास किंवा झोपल्यानंतर वेदना वाढते.
- हात-पाय सुन्न होणे: प्रभावित मज्जातंतू असलेल्या भागात सुन्नपणा किंवा मुंग्या येतात.
- कमकुवतपणा: स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवतो, विशेषतः हात किंवा पायांमध्ये.
- चालताना किंवा उभे राहताना त्रास: पाय किंवा पाठ दुखते, तसेच दीर्घकाळ उभे राहिल्यास त्रास जाणवतो.
- कंबरेतून पायाकडे जाणाऱ्या नसांमध्ये वेदना (सायटिका): हा त्रास विशेषतः कंबरेतील डिस्क बल्जमुळे होतो.
डिस्क बल्जचे निदान कसे होते?
डिस्क बल्ज ओळखण्यासाठी तज्ञ डॉक्टर काही चाचण्या आणि तपासण्या करतात.
- शारीरिक तपासणी: डॉक्टर वेदना, कमजोरी, आणि हालचालींची मर्यादा तपासतात.
- एमआरआय (MRI) आणि एक्स-रे (X-ray): यामुळे पाठीच्या डिस्क्स आणि हाडांची स्थिती स्पष्ट दिसते.
- सीटी स्कॅन (CT Scan): हे पाठीच्या कण्याच्या अधिक स्पष्ट तपासणीसाठी वापरले जाते.
डिस्क बल्जवरील उपचार
अनेक उपलब्ध उपचारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते.
शस्त्रक्रियेशिवाय उपचार पर्याय:
- फिजिओथेरपी: पाठीच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी काही विशिष्ट व्यायाम सुचवले जातात.
- औषधोपचार: वेदना आणि सूज कमी करण्यासाठी डॉक्टर काही वेळा अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स आणि पेन किलर औषधें सुचवतात.
- स्पायनल डिकंप्रेशन ट्रीटमेंट: एक आधुनिक आणि सुरक्षित उपचार, ज्यामध्ये पाठीच्या हाडांवरील दाब हलक्या पद्धतीने कमी केला जातो. यामुळे डिस्क मूळ स्थितीत परत येते आणि वेदना दीर्घकाळापर्यंत कमी होतात.
शस्त्रक्रिया (केवळ गंभीर प्रकरणांमध्ये):
जर इतर कोणतेही उपचार उपयोगी ठरत नसतील आणि रोजच्या हालचालींवर विपरीत परिणाम होत असेल, तर डॉक्टर शस्त्रक्रियेचा विचार करतात.
डिस्क बल्जची काळजी कशी घ्यावी?
तुमच्या दैनंदिन जीवनात खालील टिप्स लागू करा.
१. योग्य बसण्याची सवय लावा: सरळ बसा आणि पाठीला आधार द्या. लॅपटॉप किंवा संगणकाचा स्क्रीन डोळ्यासमोर ठेवा.
२. नियमित व्यायाम करा: पाठीचे स्नायू मजबूत करण्यासाठी स्ट्रेचिंग आणि हलका व्यायाम करा. चालणे, पोहणे, आणि योगासने फायदेशीर ठरतात.
३. जड वस्तू उचलताना काळजी घ्या: वाकून उचलण्याऐवजी गुडघे वाकवून वजन उचला.
४. वजन नियंत्रित ठेवा: लठ्ठपणा टाळा कारण जास्त वजन पाठीवर ताण आणते.
५. दीर्घकाळ एकाच स्थितीत राहू नका: प्रत्येक तासाला कामापासून छोटासा ब्रेक घ्या आणि शरीराची थोडी हालचाल करा.
तुमच्या जीवनशैलीतील हे बदल तुमच्या वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी ANSSI वचनबद्ध आहे.
ANSSI Wellness शी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.