दीर्घकालीन आणि गंभीर पाठदुखीच्या अनेक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया हा एक अखेरचा उपाय आहे. परंतु पाठीच्या वेदनांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रत्येकाने हा मार्ग स्वीकारणे जरुरी नाही. शक्य असल्यास मणक्याची शस्त्रक्रिया टाळण्यापाठी अनेक कारणे आहेत.
मणक्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय हलक्यात घेऊ नका. तुमच्या शरीराच्या कार्यक्षमतेसाठी मणका हा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि त्यासंबंधीत प्रत्येक शस्त्रक्रियेमध्ये गंभीर जोखमी आहेत ज्या तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे.
मणक्याच्या शस्त्रक्रियेसंबंधीत गंभीर जोखमी
पाठदुखीसाठी शस्त्रक्रिया ही एक व्यापक संज्ञा आहे. यामध्ये पाठीतील स्नायू, हाडे, मज्जातंतू, आणि कनेक्टीव्ह टीश्यू यांवर केल्या जाणाऱ्या कोणत्याही शस्त्रक्रियेचा समावेश होतो. या शस्त्रक्रिया मणका स्थिर करण्यासाठी, मज्जातंतूवरील दाब कमी करण्यासाठी, ट्यूमर काढून टाकण्यासाठी, आणि स्कोलिओसिससारख्या विकृतींवर उपचारासाठी केल्या जातात.
मणक्याशी संबंधित प्रत्येक शस्त्रक्रियेदरम्यान खालील परिणाम उद्भवू शकतात.
- अनिश्चित परिणाम: प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर आराम मिळेल हे नक्की नसते. शस्त्रक्रियेनंतरचा होणारा त्रास हा तुमच्या आरोग्याच्या स्थितीवर आणि मणक्याच्या समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.
- रिकव्हरीला लागणारा खूप वेळ: शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यासाठी आठवडे किंवा महिने लागू शकतात. या काळात, रुग्णांना पूर्वीसारखे दैनंदिन जीवन जगणे आणि काम करणे हे मुश्किल होऊन जाते.
- कॉम्प्लिकेशन होण्याचा धोका: शस्त्रक्रियेने इन्फेकशन, अतिरक्तस्राव, किंवा मज्जातंतूंची हानी होऊ शकते. अश्या कॉम्प्लिकेशन्समुळे स्थिती आणखी बिघडू शकते आणि वेदना तीव्र होऊ शकतात.
- मानसिक परिणाम: शस्त्रक्रिया ही तणावपूर्ण असू शकते. रिकव्हरी प्रक्रिया आणि कॉम्प्लिकेशन होण्याचा धोका तुमच्या मनामध्ये चिंता किंवा नैराश्य निर्माण करू शकतो.
- जास्त खर्च: मणक्याची शस्त्रक्रिया महाग असते. यामध्ये रुग्णालयात मुक्काम, सर्जनची फी, आणि शस्त्रक्रियेनंतरची देखभाल यांचा समावेश होतो, जे अनेकवेळा विम्यामध्ये पूर्णपणे कव्हर होत नाही.
शस्त्रक्रियेशिवाय पर्याय
शस्त्रक्रियेचा विचार करण्यापूर्वी, शस्त्रक्रियेशिवाय उपलब्ध असलेल्या इतर उपचार पर्यायांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. खालील पर्याय कमी जोखमीचे असून ते आपल्याला दीर्घकालीन आराम देऊ शकतात.
- शारीरिक उपचार: व्यायाम व ताणतणाव कमी करणारे उपाय पाठीच्या स्नायूंना बळकटी देतात.
- मालिश थेरपी: बरोबर प्रकारे केलेली मालिश स्नायू सैल करण्यास उपयुक्त आहे.
- योगा आणि स्ट्रेचिंग: योग्य मार्गदर्शनाखाली योगा आणि स्ट्रेचिंग केल्याने शरीराची लवचिकता वाढते व वेदना कमी होते.
- नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचार: ही शस्त्रक्रियेशिवाय केली जाणारी उपचार पद्धत मणक्याला सौम्य ताण देऊन पाठदुखी कमी करण्यास मदत करते. या उपचारामुळे सध्या स्पाइनल डिस्क्स आणि मज्जातंतूंवर असलेला दबाव कमी होतो आणि संबंधित पाठदुखीपासून आराम मिळतो.
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे, ANSSI रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.