डिस्क बल्ज ही मणक्याशी संबंधित एक सर्व सामान्यतः आढळणारी समस्या आहे, ज्यामुळे पाठदुखी, मुंग्या येणे, आणि हालचालींमध्ये अडचण, असे त्रास निर्माण होतात.

सर्जरीशिवाय डिस्क बल्जवर उपचार: नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट

डिस्क बल्ज ही मणक्याशी संबंधित एक सर्व सामान्यतः आढळणारी समस्या आहे, ज्यामुळे पाठदुखी, मुंग्या येणे, आणि हालचालींमध्ये अडचण, असे त्रास निर्माण होतात. अनेक वेळा डिस्क बल्जचे पेशंट “शस्त्रक्रियाच करावी लागेल” अशा गैरसमजात अडकतात. मात्र, सुदैवाने अशा प्रकारच्या त्रासावर शस्त्रक्रियेशिवायही प्रभावी आणि नैसर्गिक उपचार उपलब्ध आहेत.

डिस्क बल्ज म्हणजे काय?

आपल्या मणक्यामध्ये असलेल्या मऊ स्पाइनल डिस्क्स कण्याच्या हाडांमध्ये कुशनसारखे कार्य करतात. मात्र वयानुसार होणारी झिज, चुकीची बसण्याची सवय, किंवा अपघातामुळे काही डिस्कवर जास्त दबाव पडतो. अशा स्थितीत, डिस्कवर निर्माण झालेल्या दाबामुळे डिस्कमधील आतील मऊ पदार्थ बाहेर ढकलला जातो, ज्यामुळे डिस्कमध्ये फुगवटा निर्माण होतो. यालाच डिस्क बल्ज म्हणतात.

ही फुगलेली डिस्क जवळच्या मज्जातंतू किंवा नर्व्हवर दाब टाकते आणि त्यामुळे पाठदुखी, मानदुखी, हात-पाय सुन्न होणे, किंवा चालताना त्रास होणे, अश्या समस्या जाणवू लागतात.

नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट म्हणजे काय?

नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट (NSSDT) ही एक अत्याधुनिक उपचार पद्धती आहे जी डिस्क बल्जसारख्या स्थितींवर औषध, इंजेक्शन,किंवा शस्त्रक्रियेशिवाय उपयोगी ठरते. या ट्रीटमेंटमध्ये रुग्णाच्या मणक्याला सौम्य व नियंत्रित असा ताण दिला जातो. हा ताण मणक्यामध्ये नकारात्मक दाब (निगेटिव्ह प्रेशर) निर्माण करतो, ज्यामुळे बाहेर आलेला फुगवटा आकाराने कमी होतो आणि त्यामुळे मज्जातंतूवरील दाब सुद्धा कमी होतो.

या उपचारामुळे मणक्यातील डिस्क्सना योग्य जागा मिळते, रक्तप्रवाह सुधारतो, आणि नैसर्गिकरित्या बरे होण्याची प्रक्रिया सुरू होते. थोडक्यात सांगायचं झाल्यास, ही ट्रीटमेंट मणक्याच्या मूळ समस्येलाच लक्ष्य करते, तीही कोणतीही काटछाट केल्याशिवाय!

नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंटचे फायदे

आरोग्यपूर्ण आणि वेदनामुक्त उपचारासाठी नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन हा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे.

१. औषधमुक्त व वेदनारहित

स्पाइनल डीकंप्रेशन मध्ये कोणतीही औषधे, इंजेक्शन्स, किंवा वेदनादायक प्रक्रिया लागत नाही. त्यामुळे साईड इफेक्ट्सचा धोका जवळपास नसतो. रुग्ण ट्रीटमेंटदरम्यान आरामदायक स्थितीत असतो आणि अनेकांना पहिल्याच काही सेशन्समध्ये आराम जाणवतो.

२. डिस्क हायड्रेशन व आरोग्य सुधारते

मणक्याला दिलेल्या सौम्य ताणामुळे डिस्क्समध्ये पोषक तत्त्वे आणि पाणी शोषले जाते, ज्यामुळे डिस्क्स अधिक मजबूत होतात आणि त्यांचे आरोग्य सुधारते. हा उपचार लांब पल्ल्याचा आराम देणारा असा असतो.

३. शस्त्रक्रियेची गरज नाही

शस्त्रक्रिया हा एक अंतिम पर्याय मानला जातो. पण नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंटमुळे अशा रुग्णांना सर्जरीची गरज भासत नाही. त्यामुळे रुग्णालयातील वास्तव्य, भूल देणारी औषधे, आणि रिकव्हरीचा लांब अवधी यांपासून सुटका मिळते.

४. हालचालींमध्ये सुधारणा

डिस्कवरील दाब कमी झाल्यामुळे चालणे, वाकणे, बसणे अशा हालचालींमध्ये पूर्वीपेक्षा खूपच सुधारणा होते. अनेक रुग्ण कामावर परत येऊ शकतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन पूर्ववत होते.

५. दीर्घकालीन परिणाम

नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट केवळ तात्पुरता आराम देत नाही. हि ट्रीटमेंट रोगाच्या मूळ कारणावर उपचार करते आणि त्यामुळे या ट्रीटमेंटचे परिणाम अधिक काळ टिकतात. योग्य मार्गदर्शन, पोश्चरबद्दल सल्ला, आणि स्ट्रेचिंग यांच्यासह दिली जाणारी ही ट्रीटमेंट रुग्णाच्या संपूर्ण रिकव्हरीसाठी मदत करते.

तुम्ही नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट का निवडाल?

  • तुम्हाला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय हवा आहे?
  • औषधांनी त्रास कमी होत नाही?
  • कामावर परतण्याची इच्छा आहे पण वेदना अडथळा ठरत आहेत?

नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट कोणासाठी उपयुक्त?

  • डिस्क बल्ज / हर्निएटेड डिस्क असलेले रुग्ण
  • डीजेनेरेटिव्ह डिस्क डिजीज
  • सायटिका / नर्व्ह पिंचिंग
  • दीर्घकालीन पाठदुखी किंवा मानेचा त्रास
  • शस्त्रक्रिया टाळू इच्छिणारे रुग्ण

ANSSI Wellness मध्ये नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट

ANSSI Wellness ही भारतातील एक आघाडीची संस्था आहे जिथे नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंटमध्ये विशेषज्ञता प्राप्त केली गेली आहे. इथे औषधे, इंजेक्शन, किंवा शस्त्रक्रिया न करता पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने मणक्याशी संबंधित समस्या सोडवल्या जातात.

नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट ही एक सर्वोत्तम आणि सुरक्षित उपचार पद्धती आहे. ANSSI Wellness मध्ये ही ट्रीटमेंट अत्यंत काटेकोर प्रोटोकॉलनुसार केली जाते आणि प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार ट्रीटमेंट सानुकूलित केली जाते. शेकडो रुग्णांनी येथे उपचार घेऊन वेदनामुक्त जीवन अनुभवले आहे.

ANSSI Wellness शी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.

Picture of Dr. Pawankumar Navnath Jadhav | M.B.B.S, D. Ortho

Dr. Pawankumar Navnath Jadhav | M.B.B.S, D. Ortho

Dr. Pawankumar Jadhav is an Orthopaedic Consultant and Non-Surgical Spine Specialist with 15+ years of clinical experience and 5,000+ patients treated. He trained under leading spine surgeons at Bombay Hospital (under Dr. Arvind G. Kulkarni & Dr. Vishal Kundnani), S.L. Raheja Hospital, and Hinduja Healthcare Surgical Hospital, Mumbai. He holds an MBBS from Maharashtra University of Health Sciences, Nashik (2010) and a D.Ortho from CPS Mumbai (2018). At ANSSI Wellness, he specialises in non-surgical treatment of disc bulge, sciatica, spondylosis, retrolisthesis, and chronic neck and back pain.

Related Posts

Book Appointment

    Book an Appointment

    We are Asia’s Fastest Growing Chain of Spine Clinics. Consult With our Spine Experts and Unlock your Pain Free Life

    Step 1

    Book Appointment with our Spine Expert

    Step 2

    Get Detailed Diagnosis and a Customized Treatment Plan

    Step 3

    Complete the Treatment and Unlock the Door to Pain Free Life