बहुतेक रुग्णांना स्पायनल डीकंप्रेशन उपचारामुळे कोणतेही नकारात्मक दुष्परिणाम होत नाहीत.

नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशनचे काही दुष्परिणाम आहेत का?

नॉन-सर्जिकल स्पायनल डीकंप्रेशन तुमच्या मणक्यासाठी फायदेशीर आहे की नाही, हे समजून घेतल्यानंतर, तुम्हाला त्यासोबत येणाऱ्या संभाव्य तोट्यांबद्दल उत्सुकता असू शकते.

हे तोटे नेमके काय आहेत, हे स्पष्ट करून, उपचारानंतर काय अपेक्षित आहे हे आपण समजवून घेण्याचा प्रयत्न करूया.

स्पायनल डीकंप्रेशनची प्रक्रिया कशी असते?

स्पायनल डीकंप्रेशनसाठी प्रत्येक रुग्णाला एका विशेष डीकंप्रेशन टेबलवर झोपवले जाते. रुग्णाच्या पाठीच्या कण्याला पर्सनलायज्ड उपचार योजनेनुसार सौम्यपणे नियमित अंतराने ताणले जाते. उपचारादरम्यान रुग्ण पूर्णपणे कपडे घालून असतो, आणि प्रत्येक सत्र फक्त ३० ते ४५ मिनिटांचे असते.

मणक्यातील डिस्क बाहेर येणे आणि ती फुगणे यांवर उपाय म्हणून स्पायनल डीकंप्रेशनद्वारे मणक्यांमध्ये नकारात्मक दाब निर्माण केला जातो, ज्यामुळे रुग्णाला आराम वाटतो. या उपचारामुळे रुग्णाचा रक्तप्रवाह सुधारतो आणि डिस्कजवळच्या नसांवरील दबाव कमी होतो. यामुळे डिस्कमध्ये ऑक्सिजन आणि इतर पोषक तत्वांचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे मणक्यातील डिस्क बऱ्या होण्यास मदत होते.

संभाव्य तोटे कोणते?

या प्रश्नाचे सरळ उत्तर म्हणजे “नाही.”

बहुतेक रुग्णांना स्पायनल डीकंप्रेशन उपचारामुळे कोणतेही नकारात्मक दुष्परिणाम होत नाहीत.

तथापि, एखादी प्रक्रिया कितीही सौम्य असली तरी काही साइड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. स्पायनल डीकंप्रेशननंतर होणारे सर्वसामान्य साइड इफेक्ट म्हणजे उपचारानंतर काही आठवडे हलकी वेदना जाणवते.

मणक्याच्या स्नायूंना थोडासा ताण दिल्यामुळे जाणवणारी हि वेदना तीव्र व्यायामानंतर होणाऱ्या सौम्य वेदनेसारखी असते. स्पायनल डीकंप्रेशनमुळे कधीकधी मणक्याच्या स्नायूंमध्ये ताण किंवा हात-पायांमध्ये वेदना होऊ शकतात.

मला स्पायनल डीकंप्रेशनची गरज आहे का?

नॉन-सर्जिकल स्पायनल डीकंप्रेशन उपचार वेगाने लोकप्रिय होत आहे. याचे प्रमुख फायदे म्हणजे हालचालीत सुधारणा, सांध्यांच्या लवचिकतेत वाढ आणि मानेच्या आणि पाठीच्या दीर्घकालीन वेदना कमी होणे.

ही नॉन-इन्वेसिव्ह ट्रीटमेंट सर्जिकल डीकंप्रेशनसाठी एक चांगला पर्याय आहे. जरी नॉन-सर्जिकल स्पायनल डीकंप्रेशनसाठी लांब रिकव्हरी कालावधीची आवश्यकता नसली, तरी काही रुग्णांना दीर्घकालीन आराम मिळण्यासाठी ५ ते ७ आठवड्यांपर्यंत उपचार घ्यावे लागतात.

नॉन-सर्जिकल स्पायनल डीकंप्रेशन सर्जिकल डीकंप्रेशनच्या तुलनेत जास्त सुरक्षित आणि जलद आहे. तसेच यामध्ये शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या इन्फेकशनचा धोका कमी असतो.

हा उपचार निवडण्यापूर्वी कोणी सावधगिरी बाळगली पाहिजे?

नॉन-सर्जिकल स्पायनल डीकंप्रेशन सुरक्षित असले तरी, काही लोकांनी हा उपचार निवडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश होतो:

  • गरोदर महिला
  • ज्या व्यक्तींना मणक्यांची तीव्र झीज किंवा ऑस्टिओपोरोसिस आहे
  • ज्या रुग्णांच्या शरीरामध्ये सर्जिकल इम्प्लांट्स (स्क्रू, रॉड, प्लेट, इत्यादी) आहेत
  • ज्यांना गंभीर नर्व्ह डॅमेज, मणक्यांचे फ्यूजन, ट्युमर किंवा मणक्यांचे फ्रॅक्चर झाले आहेत

ANSSI बद्दल:

आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे, ANSSI रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.

ANSSI वेलनेसशी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.

काही महत्वाचे प्रश्न:

१) मणक्यातील बल्जिंग डिस्क (डिस्कमधील फुगवटा) आपोआप बरी होऊ शकते का?

होय, अनेक प्रकरणांमध्ये बल्जिंग डिस्कची लक्षणे काही काळानंतर आपोआप कमी होतात.

२) एमआरआयवर मणक्यातील बल्जिंग डिस्क दिसते का?

होय, मणक्यातील हर्निएटेड आणि बल्जिंग डिस्क ओळखण्यासाठी एमआरआय हि सर्वोत्तम निदान चाचणी आहे.

३) मणक्यातील बल्जिंग डिस्कसाठी मालिश फायदेशीर आहे का?

होय, मणक्यातील बल्जिंग डिस्कमुळे होणाऱ्या दीर्घकाळच्या पाठीच्या दुखण्यासाठी मालिश अल्पकालीन आराम देऊ शकते.

Picture of Dr. Pawankumar Navnath Jadhav | M.B.B.S, D. Ortho

Dr. Pawankumar Navnath Jadhav | M.B.B.S, D. Ortho

Dr. Pawankumar Jadhav is an Orthopaedic Consultant and Non-Surgical Spine Specialist with 15+ years of clinical experience and 5,000+ patients treated. He trained under leading spine surgeons at Bombay Hospital (under Dr. Arvind G. Kulkarni & Dr. Vishal Kundnani), S.L. Raheja Hospital, and Hinduja Healthcare Surgical Hospital, Mumbai. He holds an MBBS from Maharashtra University of Health Sciences, Nashik (2010) and a D.Ortho from CPS Mumbai (2018). At ANSSI Wellness, he specialises in non-surgical treatment of disc bulge, sciatica, spondylosis, retrolisthesis, and chronic neck and back pain.

Related Posts

Book Appointment

    Book an Appointment

    We are Asia’s Fastest Growing Chain of Spine Clinics. Consult With our Spine Experts and Unlock your Pain Free Life

    Step 1

    Book Appointment with our Spine Expert

    Step 2

    Get Detailed Diagnosis and a Customized Treatment Plan

    Step 3

    Complete the Treatment and Unlock the Door to Pain Free Life